
महाराष्ट्राच्या राजकारण दर दिवशी काही तरी नवीन आणि काही तरी मजेदार घडत असतं. तसंच काहीसं आज देखील घडलं आहे. आज पुणे येथील महापालिकेत ज्या पायरीवर किरीट सोमैय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याच पायरीवर भाजपच्या नेत्यांनी त्यांचा सत्कार केला. या सत्काराला आधी पोलिसांनी परवानगी नाकारली होती, त्यानंतर ही परवानगी देण्यात आली आणि सत्कार करण्यात आला. मात्र हा सत्कार काँग्रेसच्या काही पचनी पडला नाही, आणि त्यांनी या सत्कारानंतर त्या पायरीचे शुद्धीकरण केले. एकूणच हा अजब प्रकार आज पुणे महानगरपालिका येथे बघायला मिळाला.
किरीट सोमैय्या यांनी मविआ सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. कोविडसेंटर चे कंत्राट एका ब्लॅटलिस्टेड कंपनीला देण्यात आलेले आहे असे त्यांनी म्हटले आहे, आणि यासाठी त्यांनी पोलिस आयुक्तांची देखील भेट घेतली आणि त्यांनी केलेल्या दाव्यांनुसार आणि दाखवलेल्या पुराव्यांनुसार ही कंपनी बोगस असल्याचे आयुक्तांनी देखील मान्य केले आहे, असेही सोमैय्या यांनी स्पष्ट केले. एकूणच या सगळ्यावरुन गदारोळ झाला आहे. ज्या पायरीवर सोमाय्यांना धक्काबुक्की करण्यात आली त्याच पायरीवर आज भाजप नेत्यांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यामुळे एकूण चर्चेचे वादळ उठले.
त्यानंतर काँग्रेसने केलेल्या कृति नंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यासारखं त्यात काय होतं ? आणि कुठल्याही परिसराला एकादी व्यक्ति अशुद्ध कशी करू शकते असा प्रश्न इथे निर्माण होतो. हे सर्व काँग्रेस आणि मविआ सरकारची विचारधारा आणि हेतू दाखवणारं आहे, तसेच त्यांची प्रवृत्ति देखील यामुळे दिसून आली आहे. एकूणच आज जे घडलं ते मजेदार मात्र लाजिरवाणं देखील होतं.
या संपूर्ण प्रकरणात आता मविआ सरकारचा भ्रष्टाचाप पुढे येईल का? हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
