मुंबई : निवडणूक आयाेगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गाेठविण्याचा निर्णय घेतल्यावर उध्दव ठाकरे गटाने तीन संभाव्य नावे आणि चिन्हे मागितली आहेत.

निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाकडून तीन पिढ्यांची नाव सादर करण्यात आली आहेत. आजच निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्हाचा निर्णय घ्यावा अशी ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावे दिली आहेत. त्याचबराेबर संभावित चिन्ह म्हणून त्रिशुल, उगवता सुर्य आणि मशाल अशी नावे दिली आहेत.
निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेना नावही वापरता येणार नसल्याचे सांगण्यात आले. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय देण्याचेही आयोगाने सांगितले आहे.
. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या गटासाठी नाव ठरवले आहे. शिवसेना नाव गोठवल्यवर आमच्या गटाला ”शिवसेना बाळासाहेब ठाकरे” असे नाव द्यावे, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. आज दुपारी मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत या तीनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकताे.
