सोनिया गांधींनी चीन आणि पाकिस्तानसोबत मिळून एजंटचं काम केलं-भाजपा आमदार बासनगौडा

“सोनिया गांधी या विषकन्या आहेत. सगळ्या जगाने मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. एक काळ असा होता की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. नंतर त्यांनी रेड कार्पेट टाकलं आणि मोदींचं स्वागत केलं. आता मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विषारी साप असं म्हटलं आहे. ते विष ओकत आहेत असं म्हटलं होतं. मात्र मी खरगेंना सांगू इच्छितो की ज्या पक्षात तुम्ही नाचत आहात सोनिया गांधी विषकन्या आहेत. सोनिया गांधी या चीन आणि पाकिस्तानसोबत मिळून त्यांच्या एजंटचं काम केलं.” असं म्हणत भाजपा आमदार बासनगौडा यांनी सोनिया गांधींवर टीका केली.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना ‘विषारी साप’ असं म्हटलं. त्यानंतर आता कर्नाटकचे भाजप आमदार बसनागौडा यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेस प्रमुखांच्या टीकेचा मोठा विरोध झाला आणि खर्गे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर खर्गे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, “भारतीय जनता पक्ष सापासारखा आहे. जर तुम्ही चाटण्याचा प्रयत्न केला तर शेवटी तुम्ही मराल. मी पंतप्रधान मोदींबद्दल बोललो नाही. मी वैयक्तिक विधानं करत नाही. मला म्हणायचं आहे की त्यांची विचारधारा सापासारखी आहे. जर तुम्ही चाटण्याचा प्रयत्न कराल तर मृत्यू अटळ असेल.