‘सैराट’ला झाले सात वर्षे; आर्ची-परश्याचं याड अजून संपेना

आर्ची आणि परश्या यांची आपल्याला ओळख झाली ती सैराट या चित्रपटुन. आज या चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण झाली असे असले तरी या चित्रपटाची, चित्रपटाच्या कलाकारांची आणि सैराट या गाण्याची क्रेज कमी झालेली नाही. आर्ची आणि परश्यानी पोस्ट करत त्यांच्या ७ वर्ष आठवणींना पुन्हा उजाळा दिल आहे.

आकाशने ‘सैराट’ सिनेमाच्या पोस्टरचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे,”सैराट’ सिनेमाला आज सात वर्षे पूर्ण झाली…29 एप्रिल”. आकाशच्या या पोस्टवर आजही हा सिनेमा सिनेमागृहात दाखवला गेला तरी सिनेप्रेमी तेवढीच गर्दी करतील, ‘सैराट’ सारखे सिनेमे पुन्हा प्रदर्शित व्हायला हवेत, या सिनेमाने वेड लावलं, ‘सैराट 2’ कधी प्रदर्शित होणार? कितीही वेळा पाहिला तरी पुन्हा पुन्हा पाहावा असा ‘सैराट’, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

‘सैराट’ या सिनेमामुळे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे नवोदित कलाकार रातोरात स्टार झाले. 29 एप्रिल 2016 रोजी ‘सैराट’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमागृहांपासून दुरावलेल्या प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात या सिनेमाला यश आलं. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली.