राजू साळुंखे संजय राऊत यांचा उजवा हात, सुजीत पाटकरलाही अटक करण्याची किरीट सोमय्या यांची मागणी

मुंबई : खासदार संजय राऊत यांचा पार्टनर सुजीत पाटकर यांनी पुणे कोविड घोटाळा केला. संजय राऊत यांचा उजवा हात राजू साळुंखे याला अटक झाली आहे. आता सुजीत पाटकर यांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या म्हणाले, सुजीत पाटकर यांना अटक करावी या मागणीचे पत्र मी मुख्यमंत्री यांच्याकडे देत आहे. या बाबत त्यांनी दखल घ्यावी.

कोविड काळात मुंबईत 100 कोटी आणि 21 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. कोविड काळात रुग्णालयात उपचार घेणारे किती लोक होते याचा कोणताही हिशोब ठेवला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती होते त्या कंपन्या अस्तित्वात नाही. तरीदेखील या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले, असा आरोपही सोमय्या यांनी केला.

कोलई येथील ठाकरे यांच्या कथित19 बंगले घोटाळा प्रकरणी सोमय्या म्हणाले, मंत्रालयामधील महसूल अधिकाऱ्यासह 7 अधिकारी यांनी आणि उद्धव ठाकरे यांना कोणी वाचवले?माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांना वाचवले आहे.सह्या कोणी कोणी केल्या ? हे देखील पुढे येणे आवश्यक आहे.