सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरणार आहेत . 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. महविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे हे उमेदवारी अर्ज भरणार आहे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील भरणार उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

सुप्रिया सुळे यांचा अर्ज दाखल करताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सचिन अहिर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे तर खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी दाखल करण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे.

दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचादेखील 18 एप्रिललाच अर्ज दाखल करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुनेत्रा पवार नामनिर्देश पत्र विकत घेतलं आहे.18 एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवारदेखील मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता आहे.

सुनंदा पवार यांनी घेतला उमेदवारी अर्ज

बारामती लोकसभा निवडणूक अधिकच रोचक बनत चाललीय. राज्यात बारामतीमधील लोकसभेची निवडणूक चुरशीची असते. यंदा नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. या मतदारसंघातून रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा राजेंद्र पवार यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अर्ज घेतलाय. सुनंदा पवार यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज घेतलाय.

पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या चार लोकसभा मतदारसंघांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ७ मे रोजी बारामतीसाठी, तर 13 मे रोजी पुणे, शिरूर आणि मावळसाठी मतदान होणार आहे.