हिंदू धर्माचे रक्षण करणारे सगळे सत्तेत, वाईट नजरेने बघणारे घरी, नितेश राणे यांनी मानले भराडीदेवीचे आभार

विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी: आज आमच्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे सगळे सत्तेत आहेत. आमच्या धर्माकडे वाईट नजरेने बघणाऱ्या सर्वांना आई भराडीने  घरी नेऊन बसविले आहे, अशी टीका मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे यांनी केली. ( All those who protect Hinduism are in power, those with evil eyes are at home, Nitesh Rane thanked Bharadevi)
राणे यांनी आज आंगणेवाडीत भराडीदेवीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आईकडे ज्या ज्या वेळी काही मागितलं त्या त्या वेळी भरघोस दिलं आहे.
2024 वर्षात भराडी देवीने आमचे राणे कुटुंब असो किंवा भाजप पक्ष असो आम्हाला भरभराटीने दिले आहे. आज आमच्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे सगळे सत्तेत आहेत. हा आई भराडीचा आशीर्वाद आहे. आमच्या धर्माकडे वाईट नजरेने बघणाऱ्या सर्वांना आईने घरी नेऊन बसविले आहे . त्यामुळे मी आईचे आभार मानण्यासाठी आंगणेवाडीत आलो आहे
राणे म्हणाले, मी लहानपणापासून या जत्रेला येतो. या जत्रेमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो, हे या जत्रेचे वेगळेपण आहे.आमच्या कोकणामध्ये या जत्रेचं आगळंवेगळं आकर्षण आहे. त्यामुळे आमचे मुंबईकर चाकरमानी गावी येतात. एक वेगळे भक्तिमय वातावरण येथे असते. वर्षानुवर्षे या जत्रेसाठी भाविक लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. मी सुद्धा न चुकता सालाबाद प्रमाणे आईचे दर्शन घ्यायला आलो आहे.
 छत्रपती संभाजी महाराज यांच्या संगमेश्वर येथील स्मारकाबाबत राणे म्हणाले,  याबाबतची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोचविली आहे आमचे माजी आमदार प्रमोद जठार हे याप्रकरणी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *