आता खरी शिवसेना आपलीच आहे, ‘शिंदे गट’ हा शब्द पुसून टाका, नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

सांगली : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि ‘शिवसेना’ हे नाव अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलं आहे. त्यामुळे अजूनही काही लोक ‘शिंदे गट’ असा उल्लेख करतात, पण तो गट हा शब्द आपण आता पुसून टाकला पाहिजे,” असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. ( Now the real Shiv Sena is ours erase the wordShinde group appeals Neelam Gorhe)

सांगलीत आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.नीलम गोऱ्हे यांनी सांगलीत 2019 च्या पुराची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, “त्या वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नव्हते, पण त्यांनी पुढाकार घेऊन सांगलीच्या मदतीसाठी पुढे सरसावले. हीच एकनिष्ठता आणि जनतेशी जोडलेपण दाखवणाऱ्या कार्यामुळे सांगलीच्या श्री गणेशाच्या आशीर्वादाने शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना वचन दिलं, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू. या योजनेमुळे बँकांना कोट्यवधींचं व्याज मिळालं, त्यामुळे किमान महिलांसाठी बसायला खुर्ची द्या,” असा टोला त्यांनी बँकांना लगावला.

“बचत गटांकडे जर कुणी पैसे मागत असेल तर शिवरायांचे तत्व होते. ‘चुकीला माफी नाही’, हे तत्व कृतीत आणायला पाहिजे. शिंदे साहेबांनीही यासाठी पुढाकार घ्यावा,” असा सल्लाही त्यांनी दिला.