विशेष प्रतिनिधी
मुंबई : कल्याण शहरातील नांदिवली भागात एका खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. एका परप्रांतीय पुरूषाकडून बेदम मारहाण होतानाचे संपूर्ण घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. हा प्रकार होण्याच्या अगोदर रिसेप्शनिस्ट तरुणीने एका महिलेला कानशिलात मारल्याचे उघड झाले आहे. ही महिला गोकुळचे वहिनी आहे. ( The receptionist girl who was beaten up had hit Gokul Jha’s sister-in-law in the ear.)
आरोपी गोकुळ झा हा मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर आपटताना आणि तिला फरफटत नेताना दिसत आहे. पीडिता असलेली मराठी रिसेप्शनिस्ट तरुणी सोनाली हिने आधी एका महिलेला चपराक लगावली होती, असे एक फुटेज सध्या समोर आले आहे. या मारहाणीच्या घटनेआधी एक वेगळाच प्रकार घडला असल्याचे आता समोर आले आहे.
गोकुळ झा आणि काही मंडळी तेथील मराठी रिसेप्शनिस्ट तरूणीशी वाद घालत होते. त्यानंतर गोकुळ झा याने रिसेप्शन काऊंटरवर लाथ मारली. त्यामुळे रागाने लालबुंद झालेल्या मराठी तरूणीने आधी फाईल फेकली. त्यानंतर तिने रागाने पुढे येऊन तेथील एका महिलेला चपराक लगावली. त्यानंतर तो वाद चिघळला. नानम्तर गोकुळ झा याने त्या तरूणीला मारहाण केली.
मारहाणीच्या घटनेनंतर आरोपी गोकुळ झा हा फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. पण रात्री गोकुळ झा याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर गोकुळ झा यांच्या आईने यासंबंधीचा प्रकार सांगितला. रिसेप्शनिस्ट तरूणीने गोकुळच्या वहिनीच्या कानशिलात लगावली होती, त्यामुळे गोकुळला राग आला.
