हाच आहे फरक !!!

आठवून बघा.. अगदी एक वर्षाआधीच गोष्ट आहे ही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. गृहखातं त्यांच्या हातत होतं. त्यावेळेला त्यांना त्यांच्या शरीरयष्टी वरून, त्यांच्या सुसंस्कृतपणावरून, त्यांच्या जातीवरुन, त्यांच्या पत्नीवरुन अतिशय खालच्या भाषेत बोलले जायचे. त्यांच्या जातीवरुन ते मुख्यमंत्री पदावर बसण्याच्या कतृत्वाचे आहेत की नाही हे ठरवले जायचे, त्यांच्या प्रत्येक निर्णयाला त्यांच्या जातीच्या आधारावर बघितले जायचे. त्यांच्या पत्नीच्या कपड्यांवरुन त्यांना सोशल मीडियावर सगळ्यांसमोर सुनावले जायचे. मात्र असा एखादाही प्रसंग आठवतो का कि त्यांना किंवा त्यांच्या पत्नीला कोणी काही बोलल्यामुळे त्या व्यक्तिची मारहाण झाली आहे ? किंवा कुणाचे घर पाडल्या गेले आहे. किंवा तत्सम काही ? दोन मिनिटे आठवून बघा !!!

असा एकही क्षण, अशी एकही घटना आठवली नसेल, कारण तसे कधी झालेच नाही. त्यांच्या शरीरयष्टीवर भाष्य करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भर सभेत त्यांना हवा गेलेला फुगा म्हटले, त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्स वर पेड ट्रोलर्स ने कहर करत अतिशय अश्लाघ्य भाषेत त्यांना काही बाही म्हटले, मात्र त्यांनी त्यावर रिएक्ट न होणं ठरवत आपलं काम करत राहणे महत्वाचे समजले, आणि ते अविरत त्याच जनतेच्या सेवेसाठी काम करत राहीले. आता विचार करून बघा, असे जर त्यांच्या राज्यात झाले असते कि मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या आडनावाला काही म्हटले तर निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांना भीषण मारहाण झाली, किंवा एका पत्रकाराला अटक झाली, किंवा एक वृत्तवाहिनी महाराष्ट्रात बॅन झाली, किंवा एखाद्या व्यक्तिने, सेलिब्रिटीने त्यांच्या विरोधात बोलले तर त्याचे घर पाडण्यात आले असते तर ? महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण झाली असती ? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराचा कावळा कधीच केला नाही, ते केवळ चांगल्या कामावर विश्वास करतात, आणि त्यासाठी काम करतात ही त्यांची ख्याति आहे.

महाराष्ट्रात आता परिस्थिती बदलली आहे, आता सरकारचे गुंडाराज तिथे सुरु आहे. याला कोणीही दडपशाही म्हणणार नाही, कारण तसे केल्यास त्यांना देखील मारहाण होण्याची शक्यता आहे, त्यांचेही घर पाडले जाण्याची शक्यता आहे. मात्र आज जर महाराष्ट्रात तुम्ही सरकारच्या विरोधात एक अवाक्षरही काढले, किंवा एखादी पोस्ट व्हॉट्सएप वर फॉरवर्ड जरी केली, तरी तुम्हाला त्याने मारहाण होऊ शकते, असे चित्र दिसून येत आहे. सामान्य जनतेचा एकच प्रश्न आहे, हाच दिवस बघण्यासाठी आपण मतदान केले होते का ? आमच्या मतदानाने नाही, तर स्वत:च्या हट्टाने एक व्यक्ति मुख्यमंत्री होते, तर त्याची शिक्षा आम्ही का भोगावी ?

आज महाराजांच्या महाराष्ट्रात प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सामान्य जनतेचे हाल हाल होताएत, साधू संतांच्या जीवाला धोका आहे, त्यांना ठेचून ठेचून मारले जात आहे, बॉलिवुडचे मोठे ड्रग रॅकेट सुरु आहे, आणि त्याच बॉलिवुड सोबत महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांचे रोजचे उठणे बसणे आहे, सेलिब्रिटी जगतातील दोन मोठे मृत्यु होतात, मात्र मुंबई पोलिसांवर दबाव असल्याचे चित्र दिसून येते. ‘अंधेर नगरी चौपट राजा’ अशी स्थिती महाराष्ट्राची झाली आहे. सामान्य जनतेचा प्रश्न हा आहे कि हे सर्व कधी पर्यंत चालणार, आणि त्यांना या नरक यातनांपासून सुटका कधी मिळणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *