१८ वर्षांच्या वर वयाच्या नागरिकांसाठी लसीचे रजिस्ट्रेशन सुरु


अखेर आता भारतात १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी कोविडची लस घेण्यासाठीचे रजिस्ट्रेशन आजपासून सुरु करण्यात आले आहे. आज दुपारी ४ वाजेपासून हे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. यासाठी आपल्याला आपला फोटो आयडेंटिटि प्रूफ म्हणजेच आधार कार्ड / पॅनकार्ड किंवा लायसेंस इत्यादिची आवश्यकता असेल. भारतासाठी ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे. कारण कोविडचे लसीकरण वाढल्यावर भारतात असलेल्या भीषण परिस्थितीवर आळा घालता येईल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

रजिस्ट्रेशन कसे करयाचे ?

रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण सरकारच्या कोविन या वेबसाईट वर जाऊ शकता. खाली दिल्या प्रमाणे व्हॅक्सिनेशन बे बटन क्लिक केल्यास आपल्याला पुढील प्रोसेस करता येईल.

१. https://www.cowin.gov.in/home या लिंक वर क्लिक करा, किंवा आरोग्य सेतु एप वर क्लिक करा.  तिथे रजिस्टर / साइन इन युअरसेल्फ असे लिहिले असेल त्यावर क्लिक करा.

२. आपला मोबाइल नंबर टाका.

३. एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट करा.

४. ओटीपी सबमिट केल्यानंतर आपल्याला फोटो आयडी प्रूफ निवडावा लागेल (यामध्ये आपण आधार कार्ड / पॅन कार्ड / लायसेंस इत्यादि निवडू शकता ) सर्व डीटेल्स भरा.

५. खालील दिलेल्या व्हिडियो प्रमाणे आपण आपले डीटेल्स भरल्या वर आपल्याला आपला पिन कोड विचारण्यात येईल.

https://www.instagram.com/reel/CONRl-Lpus1/



६. पिनकोड टाकल्यावर आपल्या जवळपास असलेल्या रुग्णालयांची यादी आपल्या समोर येईल त्यातून आपण आपल्या सोयीनुसार रुग्णालय, दिवस आणि वेळ ठरवा.

७. कन्फर्म वर क्लिक करा |

आपले रजिस्ट्रेशन झाले.

अधिकाधिक रजिस्ट्रेशन करा आणि लस लावून घ्या. लसी संबंधी कुठल्याही भ्रांतींवर विश्वास ठेवू नका आणि देशाच्या या महाव्हॅक्सीनेशन ड्राईव्ह मध्ये सहभागी व्हा.