तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा,चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!

सोमवारी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा-शिंदे गटावर टीका केली होती. भारतीय जनता पक्ष मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करत असून शिंदे गट हे निमूटपणे बघत आहे, असे ते म्हणाले होते. दरम्यान, या टीकेला भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंचा ;चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

चित्रा वाघ यांनी ट्विट करुन लिहिले की, उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई तोडण्याची जुनी कॅसेट वाजवायला सुरू केलीय. पण जनता सुज्ञ आहे. तुमच्या या भूलथापांना जनता भीक घालणार नाही. आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही… तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, तुम्ही मुंबईची काळजी करू नका… मुंबई सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी सक्षम आहेत. तुम्ही तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा… असे म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.