आयपीएलमधील 2 चॅम्पियन आमनेसामने; रोहितच्या पलटण समोर धोनीचे सुपर किंग्ज

आज आयपीएल 2023 मध्ये डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज, 06 मे रोजी चेन्नईच्या घरच्या मैदानावर पार पडणार आहे. एमए चिदंबरम स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. यंदाच्या मोसमात या दोन संघांमध्ये याआधी रंगलेल्या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा पराभव केला होता. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई संघाने मुंबईचा सात विकेट्सने पराभव केला. आयपीएल 2023 मधील 12 व्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज मुंबई संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरेल.

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज 35 वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सने 20 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर चेन्नईने 15 सामने जिंकले. तर मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ चॅम्पियन आहेत. मुंबईने चार वेळा या लीगचे विजेतेपद पटकावले आहे. तर चेन्नई संघाने चार वेळा चॅम्पियन बनला आहे. अशा स्थितीत दोन्ही संघ मैदानात उतरतील तेव्हा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत 35 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईचं पारडं जड दिसून आलं आहे. 35 सामन्यांपैकी मुंबई संघाने 20 सामने तर चेन्नई संघाने 15 सामने जिंकले आहेत. पण यंदाच्या मोसमात याआधी झालेल्या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार असून याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

चेपॉक येथील मैदान फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरले आहे. अशा परिस्थितीत येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा मिळू शकतो. फलंदाजीत धावा सहज होतात. अशा परिस्थितीत गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये रोमांचक स्पर्धा पाहायला मिळते. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना सरासरी 163 धावा झाल्या आहेत. त्यामुळेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने या मैदानावर सर्वाधिक विजय मिळवले आहेत. अशा परिस्थितीत या मैदानावर कोणता संघ नाणेफेक जिंकेल. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दोन्ही संघाचे संभाव्य प्लेइंग-11
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे आणि महिश तीक्षणा/दीपक चहर.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कॅमेरून ग्रीन, पियुष चावला, अर्शद खान, ईशान किशन (यष्टीरक्षक), कुमार कार्तिकेय आणि जोफ्रा आर्चर.