आयपीएल मध्ये आज वानखेडेवर मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना रंगणार

आयपीएलच्या 16 व्या हंगामात आज रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा सामना फाफ डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरूवात होईल.प्ले ऑफच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल.

बंगळुरू संघाने मुंबईविरुद्ध या मैदानावर सलग तीन सामने गमावले आहेत. अशा स्थितीत या सामन्यातील पराभवाचा क्रम खंडित करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या मैदानावर त्यांचा शेवटचा विजय 2015 मध्ये होता. वानखेडेवर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 8 सामने झाले आहेत. त्यापैकी 5 मुंबईने जिंकले. त्याचवेळी बंगळुरूला केवळ तीन सामने जिंकता आले आहेत.

पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि त्याचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यासाठी आयपीएलचा सध्याचा हंगाम चांगला गेला नाही. मुंबईला 10 पैकी 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. हिटमॅनही आतापर्यंत बॅटने अपयशी ठरला आहे. रोहितने 10 सामन्यांत केवळ १८४ धावा केल्या आहेत.
बंगळुरूने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 5 सामने जिंकले आणि 5 गमावले आहेत. संघाचे 10 गुण आहेत.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (C), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, आकाश मधवाल, अर्शद खान

आरसीबी – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड