धडाकेबाज छगन भुजबळ; शिवसेना ते राष्ट्रवादी प्रवास

छगन भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात 1960 साली शिवसेना या राजकीय पक्षातून केली. मुंबई महापालिकेत त्यांना मोठा सन्मान मिळाला. 1973 साली ते मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.1973 ते 84 या काळातील मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता झाले,1985 मध्ये महापौर झाले.1991 मध्ये ते दुसऱ्यांदा महापालिकेत मुंबईचे महापौर झाले. छगन भुजबळ पंचवीस वर्षे शिवसेनेत राहिले पण बाळासाहेब ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या टोकाचे मतभेद झाले आणि शेवटी छगन भुजबळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.

हे घडलं कसं तर शरद पवार हे बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला अधून मधून मातोश्रीवर येत असत. त्यांची नजर छगन भुजबळांवर पडली. त्यांनीच भुजबळांवर गळ टाकायला सुरुवात केली. त्यातून शिवसेना फोडून भुजबळ यांना आपल्या बाजूला वळवलं.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा हा धक्काच होता. जेव्हा शरद पवार यांच्या संगनमतानं भुजबळांनी शिवसेनेची साथ सोडली.

शरद पवार हे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. शरद पवार आणि भुजबळांसाठी हे मोठं धाडस होतं. पण राजकीय व्यवहार म्हणून बाळासाहेबांनी शेवटी हे मान्य केलं. पण आपल्यातील चांगला कार्यकर्ता शरद पवारांनी फोडला ही सल त्यांच्या मनात कायम होती.म्हणून राष्ट्रवादी फुटीच्या भाषणात भुजबळांनी उल्लेख केला तेव्हा बोलताना भुजबळ म्हणाले जेव्हा मला पवार साहेब तुम्ही सोबत घेऊन आलात तेव्हा बाळासाहेबांना आणि मासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले.तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे असलेले धनंजय मुंडे यांना तुम्ही पक्षात घेऊन आलात तेव्हा गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या डोळ्यातही अश्रू आले असतील. असा उल्लेख भुजबळांनी केला म्हणून शरद पवार पुरते उघडे पडले आहे.

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ पन्नास वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.1991 मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली.त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.राज्यातील सत्ताकारणात महत्वाचा भाग बनलेले छगन भुजबळ यांनी राजकीय बदलाचे संकेत वेळोवेळी दिले होते.काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीने मराठा समाजाचा पक्ष अशी प्रतिमा बदलण्याची गरज व्यक्त केली होती.भुजबळांनी राष्ट्रवादीविषयी इतकी स्पष्ट भूमिका यापूर्वी कधीही न मांडल्याने त्यांनी जणू दल बदलण्याचेच संकेत दिले होते अशी चर्चा सध्या सुरू आहे.

राज्यभरात अनेक भागात कार्यकर्त्यांचे मोठे संघटन असणार्‍या छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा चार ते पाच वर्षांपासून सुरू होत्या. मात्र, भुजबळ यांच्याकडून वारंवार या चर्चा फेटाळल्या जात होत्या.भुजबळ यांच्यावर जेव्हा महाराष्ट्र सदनातील अपहाराचे आरोप झाले होते.तेव्हा त्यांच्या अडचणीत वाढ करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातील नेते अग्रेसर होते. त्यानंतर त्यांना तुरूंगाचीही हवा खावी लागली.

मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक जिल्ह्यातील राजकीय कारकीर्द विरोधकांना विचार करायला लावणारीच आहे. मुंबई ते नाशिक असा राजकीय प्रवास करणारे मंत्री छगन भुजबळ मुंबईत बाळा नांदगावकर यांच्याकडून माझगाव विधानसभा मतदारसंघात 1995 व 99 मध्ये पराभूत झाल्यानंतर भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिथल्या कामांमुळे भुजबळांचा 2004 मध्ये विजय झाला. पुतण्या समीरला नाशिक लोकसभा, तर मुलगा पंकजला नांदगाव विधानसभा मतदारसंघ अशी वाटणी झाली. समीर भुजबळ लोकसभा निवडणुकीत विजयी झाले तेव्हाही नाशिक महानगरातील तीनपैकी दोन विधानसभा मतदारसंघांत ते पिछाडीवरच होते. भुजबळांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढली गेली. त्यातही भुजबळांच्या प्रयत्नाने उमेदवारी मिळालेल्या राष्ट्रवादीच्या अनेक जणांना पराभव स्वीकारावा लागला होता. भुजबळांना उघडपणे पक्षांतर्गत विरोध झाला नसला तरी निवडणुकीच्या मैदानावर विरोधी उमेदवारास रसद पुरविण्याचे काम पक्षांतर्गत विरोधकांनी केले. मागील लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये भुजबळांच्या पुतण्याचा भल्यामोठ्या मताधिक्याने पराभव होण्याच हे मुख्य कारण होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हात भुजबळांना प्रतिस्पर्धी म्हणून दिवंगत डॉ. वसंत पवार यांचे नाव घेतले जात असे. त्यानंतर डॉ. पवार यांच्या निधनानंतर भुजबळ यांना जिल्ह्यात तरी त्यांच्या तोडीचा राजकीय प्रतिस्पर्धी नव्हता. म्हणून भुजबळांचे स्थानिक राजकारण केवळ येवला तालुक्यापुरते मर्यादित राहील, या भ्रमातून विरोधक जागे होईपर्यंत भुजबळांनी जिल्ह्यातील इतर सर्वच सत्तास्थानांना धडक देणे सुरू केले होते. मुंबईसारख्या शहरात शिवसेनेचे दोन वेळा महापौर राहिलेल्या छगन भुजबळांनी प्रथम विधानसभेत माझगावमधून विजयी मिळवून दिला. त्या भुजबळांना मुंबईतून बाहेर जावे लागले. त्यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खेळात मुंबईबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि येवल्याचे प्रतिनिधीत्व स्वीकारले. येवला ही पूर्वीपासून नगरपालिका. येवले शहरात यापूर्वी राजकीयदृष्ट्या जनसंघ भाजपा होता.ती जागा मधल्या काळात शिवसेनेने घेतली.

येवल्यात शिवसेनेचे आमदार 1998,1995 मध्ये निवडून येत होते. परंतु आता ही जागा राष्ट्रवादीने घेतली आहे. छगन भुजबळांचा ‘गड’ म्हणजे माझगाव. परंतु मुंबईत भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांचा 1991 मध्ये पहिला पराभव एका शिवसैनिकाने केला. त्यानंतर दुसर्‍यांदा भुजबळांनी प्रयत्न केल्यानंतरही त्यांना हार पत्करावी लागली ते राष्ट्रवादीत मागील दरवाज्यांनी विधान परिषदेत गेले. तेथे विरोधी पक्षनेतेही झाले.परंतु त्यांना खंत होती ती आपण मागील दरवाज्यानं आलो. त्याची त्यासाठी ते मतदारसंघ शोधीत होते.त्यातून भुजबळांच्या पुढे येवल्याचे नाव शरद पवारांनी सुचविले. भुजबळ हे माळी समाजाचे ओबीसी नेते असल्याने त्यावेळी माधव म्हणजे माळी,धनगर,वंजारी फॅक्टर महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने राबवल्या जात होता. त्याचा भुजबळांना निवडणुकीत फायदा झाला. त्या काळात समता परिषदेचे काम सुरू झाले आणि येवला, निफाड, लासलगाव आदी भागांतून मोठे कार्यकर्ते पुढे आले. त्यातून विधानसभेसाठी येवला हा मतदारसंघ निवडला आणि त्यांनी आपले कार्यक्षेत्र नाशिक जिल्हा हे केले.