महाराष्ट्रानंतर नागालँडमध्येही शरद पवारांना धक्का

शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लोंगकुमे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांविरोधात दाखल केलेली अपात्रतेची याचिका फेटाळून लावली आहे. शदप पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिन हेमंत टकले यांनी 30 ऑगस्ट 2023 रोजी सात आमदार – पिक्टो शोहे, पी. लॉन्गॉन, नम्री नचांग, ​​वाय. म्होनबेमो हमत्सो, तोइहो येप्थो, वाय मानखाओ कोन्याक आणि ए पोंगशी फोम यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती.

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर नागालँडमधील पक्षाच्या सात आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून तेथील विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्रातील निकाल आल्यानंतर नागालँडमधूनही अजित पवारांसाठी खूशखबर समोर आली आहे.राष्ट्रवादीचे सर्व सात आमदार पात्र असल्याचा निकाल नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लोंगकुमेर यांनी दिला आहे. शरद पवार गटाकडून करण्यात आलेली याचिका त्यांनी फेटाळली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालाचा आधार घेत त्यांनी हा निकाल दिला आहे.

16 फेब्रुवारी 2024 (शुक्रवार) रोजीच्या आदेशात विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, आता निवडणूक आयोगाचा निर्णय आला आहे. ज्या आमदारांविरोधात तक्रार दाखल झाली होती, त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला होता. आयोगाच्या निर्णयानुसार आता त्यांना पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधातील तक्रारी प्रलंबित ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही.

नागालँड विधानसभेत शरद पवार गटाकडून आमदार इ. पिक्टो शोहे, पी. लॉन्गॉन, नम्री नचांग, ​​वाय. म्होनबेमो हमत्सो, तोइहो येप्थो, वाय मानखाओ कोन्याक आणि ए पोंगशी फोम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हेमंत टेकले यांनी 30 ऑगस्ट 2023 रोजी सात आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली होती, कारण या आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने समर्थनाची पत्रे दिली होती. हेमंत यांनी सात आमदारांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला होता.