विशेष प्रतिनिधी
मुंबई : काॅंग्रेसबराेबर जाऊन उध्दव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिल्यामुळेच शिवसेनेत उठाव हाेऊन उभी फूट पडलील अशी टीका उध्दव ठाकरेंच्या सहकाऱ्यांनीच केली हाेती. ठाकरेंनी हिंदूत्ववादी भूमिका साेडल्याचा आराेप हाेताे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंना थेट सवाल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राखणार की तृष्टीकरण करत राहणार असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. (The Chief Ministers direct question to Uddhav Thackeraywill he maintain Balasahebs views or will he continue to satisfy them)
मोदी सरकारकडून बुधवारी वक्फ सुधारण विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. संसदेच्या संयुक्त समितीच्या अहवालानंतर सुधारणा करण्यात आलेल्या विधेयकावर लोकसभेत बुधवारी चर्चा होईल. मग, विधेयकाच्या मंजुरी प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. कें हे विधेयक मंजूर होताना शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) खासदारांची भूमिका काय असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेने सॉफ्ट हिंदुत्त्वाचा मुद्दा हातात घेतला आहे. असे असताना दुसरीकडे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंनी हिंदुत्त्व सोडल्याचा सातत्याने आरोप केला जातो. पण, आपण हिंदुत्त्व सोडले नाही, हे उद्धव ठाकरे सातत्याने सांगतात. आता वक्फ सुधारण विधेयकावर लोकसभेतील ठाकरेंचे नऊ खासदार काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. एक्स या साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर एक पाेस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?,” असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
मोदी सरकार ने ‘वक्फ बोर्ड अधिनियम – १९९५’ या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक ८ ऑगस्ट राेजी लोकसभेत सादर केले हाेते. सुधारित विधेयकाला अनेक विरोधी पक्षांनी व काही संघटनांनी विरोध केला आहे. इंडिया आघाडीतील पक्ष या सुधारित विधेयकाच्या विरोधात आहेत. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलं तेव्हा ठाकरे गटाचे खासदार लोकसभेतील चर्चेवेळी अनुपस्थित होते.या विधेयकाबाबत ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. संसदेबाहेर विधेयकास विरोध केल्याने हिंदुत्ववादी संघटना व पक्ष ठाकरे गटाविरोधात आक्रमक झाले आहेत. तर संसदेत भूमिका न मांडल्यामुळे मुस्लिम समुदाय ठाकरे गटावर नाराज आहे.
दुसऱ्या बाजुला बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच वक्फ बाेर्डाबाबत आक्रमक भूमिका घेतली हाेती. मुस्लिमांचे लांगूलचालन आणि तृष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या पक्षांना नेहमीच फटकारले हाेते. आता बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्रच वक्फ बाेर्डाच्या सुधारणांना विराेध केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमका निशाणा साधला आहे.
