नकुल भोईर खून प्रकरणात आरोपी पत्नीचा प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

विशेष प्रतिनिधी

पिंपरी : नकुल भोईर प्रकरणाला आता नवे आणि अनपेक्षित वळण लागले आहे. आरोपी पत्नी चैताली भोईर हिच्या प्रियकराला चिंचवड पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाचा तपास आता नव्या दिशेने सुरू झाला आहे. अटक झालेल्या तरुणाचे नाव सिद्धार्थ दिपक पवार (वय २१, रा. बालाजी अपार्टमेंट, कोहिनूर डेकोर शॉपच्या वरती, लिंक रोड, चिंचवड) असे आहे.
( Accused wifes lover in Nakul Bhoir murder case taken into police custody)

पोलिसांच्या माहितीनुसार, चैताली भोईर आणि सिद्धार्थ पवार यांच्यातील संबंधांची माहिती मृत नकुल भोईर याला मिळाल्यानंतर त्यांच्या वैवाहिक नात्यात गंभीर तणाव निर्माण झाला होता. त्यातूनच घरगुती वाद वाढत गेले आणि अखेर या घटनेचा शेवट दुर्दैवीरीत्या झाला. तपासात या प्रेमसंबंधामुळेच प्रकरण गुंतागुंतीचे बनले असल्याचे समोर आले आहे.

तपास अधिकार्‍यांनीCc सांगितले की, चैताली आणि सिद्धार्थ हे दोघेही एकमेकांच्या नियमित संपर्कात होते. मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि चॅट्सच्या आधारे पोलिसांनी सिद्धार्थला ताब्यात घेतले. पोलिस आता प्रेमसंबंधातून कट रचला गेला का याचा सखोल तपास करत आहेत.

दरम्यान, आरोपी चैताली भोईरविरुद्ध आधीच गुन्हा दाखल असून ती पोलिस कोठडीत आहे. तिची आणि सिद्धार्थची सामोरे चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीतून घटनेमागील खरे कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नकुल भोईर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते होते. पर्यावरण चळवळीतही ते कार्यरत होते. त्यांची पत्नी चैताली आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक होती. मात्र चैतालीने ओढणीने गळा आवळून नकुल याचा खून केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *