लाज वाटत नाही का? आम्हालाही ती भाषा येते…भाजपवर टीका करणाऱ्या अमोल बालवडकर यांना लहू बालवडकर यांचा इशारा

डीसीएन न्यूज नेटवर्क

पुणे: ज्या नेत्यांच्या पाठिंब्यावर इतकी वर्षे राजकारण केले, मोठी पदे, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवली, त्यांच्याबद्दल अशा शब्दांत बोलताना लाज वाटत नाही का? शिवराळ भाषा आणि खालच्या पातळीवर उतरायचे असेल, तर आम्हालाही ती भाषा येते. ठकास आम्ही महाठक आहोत, हेही लक्षात ठेवा, अशा कठोर शब्दांत भाजपचे अधिकृत उमेदवार लहू बालवडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.
( Arent You Ashamed We Can Speak That Language TooLahu Balwadkar Warns Amol Balwadkar)

बाणेर–बालेवाडी मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी दिल्यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. प्रभाग क्रमांक ०९ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार लहू बालवडकर यांनी अमोल बालवडकर यांच्यावर निशाणा साधला.
लहू बालवडकर म्हणाले की, “भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करत आहेत. मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशा काही नाराज घटकांकडून जाणीवपूर्वक शांत वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचे नेते आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. त्यांच्या विरोधात जर कोणी गरळ ओकत असेल, तर त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत.”
उमेदवारी दाखल करतानाच पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळे काही लोक ‘सूर्यावर थुंकण्याचे’ प्रकार करत असल्याचा आरोप करत, “असले उद्योग तात्काळ थांबवा, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *