डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ जशी जवळ येत आहे, तसतसा प्रभाग क्रमांक ०९ मधील राजकीय वातावरण चांगलाच तापू लागले आहे. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत नगरसेवक उमेदवार सौ. रोहिणी सुधीर चिमटे, गणेश जानोबा कळमकर, मयुरी राहुल कोकाटे व लहू गजानन बालवडकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बाणेर येथून निघालेल्या भव्य पदयात्रेने संपूर्ण प्रभागाचे लक्ष वेधून घेतले.
( BJP Kicks Off Power Show in Ward 09Grand Padyatra of Party Candidates Draws Massive Public Response(
पक्षाचे झेंडे, घोषणांचा गजर, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांची गर्दी यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा जल्लोष पाहायला मिळाला. हनुमान मंदिर, राम मंदिर, भैरवनाथ मंदिर, पुणे महानगरपालिका कचरा शाळा, श्री सावतामाळा मंदिर, बालेवाडी फाटा, श्री गणेश मंदिर ते शिवम बालवडकर संपर्क कार्यालय असा हा प्रचार मार्ग होता.
पदयात्रा जिथे जिथे पोहोचली, तिथे तिथे नागरिकांनी फुलांची उधळण, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त घोषणांनी उमेदवारांचे स्वागत केले.
यावेळी लहू बालवडकर यांनी सांगितले “हा प्रचार नाही, हा विकासाचा संकल्प आहे. प्रभाग ०९ मध्ये स्वच्छता, पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, सुरक्षा आणि सुशासन यासाठी आम्ही ठोस कृती आराखड्यासह मैदानात उतरलो आहोत. आजचा जनसमुदाय आणि नागरिकांचा विश्वास पाहता विजय आमचाच आहे. “
या प्रचार यात्रेत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि संघटनेची ताकद पाहता भाजपाने या प्रभागात निवडणुकीच्या रणधुमाळीत आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
“फक्त घोषणा नाहीत, कामाचा अनुभव दिसतो. उमेदवार रस्त्यावर उतरून आमच्याशी बोलत आहेत, हीच खरी लोकशाही आहे. यावेळी आम्ही विकासालाच मत देणार,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकांनी दिली.
दरम्यान, एकीकडे विरोधक अजून रणनीती आखण्यात गुंतलेले असताना, भाजपाने मात्र थेट जनतेत उतरून प्रचाराची आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक ०९ मध्ये आज झालेल्या या पदयात्रेमुळे निवडणूक लढतीला खरी रंगत आली आहे.
