डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ (मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क) मध्ये भारतीय जनता पार्टीकडून जोरदार प्रचार सुरू असून, रविवारी (दि. ४ जानेवारी) आंबेडकर नगर, मार्केट यार्ड परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली.
( Grand BJP Padyatra in Ward 21 Sends Strong Message of Development and Trust)
या पदयात्रेत भाजपचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ यशवंत भिमाले, प्रसन्नजीत भरत वैरागे, सिद्धी अविनाश शिळीमकर आणि मनिषा प्रविण चोरबेले यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत विकासकामांचा आढावा घेतला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून पुढील काळात नियोजनबद्ध विकास करण्याचे आश्वासन देण्यात आले. “विकास आणि विश्वासाच्या जोरावर ही निवडणूक निश्चितच जिंकू,” असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पदयात्रेत आमदार सुनील कांबळे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा निमंत्रित कार्यकारिणी सदस्य दीपक तथा बाबाशेठ मिसाळ, माजी नगरसेविका वंदना भिमाले यांच्यासह भाजपा, आरपीआय (आठवले गट) व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी नागरिकांना १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात “कमळ” चिन्हासमोरील बटन दाबून भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
