डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 ब मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश कळमकर यांनी आपल्या प्रचारात सर्वच मतदारांपर्यंत पोहचण्याचे काम केले आहे. या प्रचारादरम्यान त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून, मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणून देण्याची ग्वाही दिली आहे.
( Growing Support for Ganesh Kalmkar as Voters Pledge Victory)
आज कळमकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील निकष स्किएस , सेरेनाडे रॉयल आणि अटलांटिस प्लॅटिनम सोसायट्यांना भेट देऊन नागरिकांची थेट घेऊन संवाद साधला. या वेळी भाजप प्रभाग क्रमांक ०९ चे अधिकृत उमेदवार म्हणून सौ. रोहिणी सुधीर चिमटे, सौ. मयुरी राहुल कोकाटे आणि श्री. लहू गजानन बालवडकर उपस्थित होते. नागरिकांनी मोकळेपणाने प्रश्न मांडले व येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
