कुकू बार-रेस्टोरंटवर गुन्हा दाखल रात्री मोठ्या आवाजात स्पीकर लावणे भोवले

विशेष प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर येथील कुकू बार अँड रेस्टोरंटवर पोलिसांनी कारवाई केली असून भारतीय न्याय संहिता २२३, २९३, महाराष्ट्र पोलीस कायदा ३३ क्ष, आर डब्ल्यू सह १३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. ( Case registered against Kuku Bar-Restaurant
Bhovale accused of installing loud speakers at night)

फयाज फकिरुद्दीन मीर (वय ३४, रा.सारा होम, शिवनेरी नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याची नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील गुडविल सोसायटीमध्ये कुकू बारा रेस्टोरंट आहे. याठिकाणी रात्री उशिरापर्यंत दारू ग्राहकांना पुरवली जात असून याठिकाणी जोरजोरात स्पीकर लावले जात असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झालेली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रात्री साडेबाराच्या सुमारास आसपास राहणाऱ्या नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारे मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजवीत असल्याचे निदर्शनास आले. यासोबतच, दहा ते बारा ग्राहकांना सेवा देत असताना आरोपी आढळून आला. पोलीस आयुक्तांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १६३ च्या अनुषंगाने दिलेल्या आदेशांचा भंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *