खुळेवाडीत पदयात्रेद्वारे मतदारांशी थेट संवाद; नागरिकांचा विश्वास ऊर्जा देणारा : सुरेंद्र पठारे

डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : प्रभाग क्रमांक ०४ मधील खुळेवाडी परिसरात पदयात्रा काढत नागरिकांचे मनापासून आशीर्वाद घेतले. घराघरांतून मिळालेला विश्वास निश्चितच ऊर्जा देणारा असून, तोच पुढील कामासाठी प्रेरणा देईल, असे सुरेंद्र पठारे यांनी सांगितले.
(Direct Voter Outreach Through Padayatra in Khulewadi Public Trust Becomes a Source of StrengthSurendra Pathare)

पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना पठारे म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून निर्णय घेताना जनता केंद्रस्थानी असेल. प्रशासनाशी समन्वय साधत आणि नागरिकांना सोबत घेऊनच प्रत्येक काम पुढे नेले जाईल, हा आमचा स्पष्ट विचार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांवर दीर्घकालीन व शाश्वत उपाययोजना करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या पदयात्रेत शैलजीत जयवंत बनसोडे, सौ. रत्नमाला संदीप सातव आणि तृप्ती संतोष भरणे हे उमेदवार उपस्थित होते. आम्ही चौघेही एकाच ध्येयाने पुढे चाललो आहोत आणि ते म्हणजे प्रभाग क्रमांक ०४ चा सर्वांगीण विकास. हा विकास लोकांच्या विश्वासावर आणि त्यांच्या सक्रिय सहभागावर उभारलेला असेल, असे पठारे यांनी स्पष्ट केले.

मतदारांचा पाठिंबा आणि सातत्यपूर्ण संवाद हीच आमची खरी ताकद असल्याचे सांगत, त्याच जोरावर खुळेवाडीसह संपूर्ण प्रभागाला नियोजनबद्ध, सुरक्षित आणि प्रगत दिशेने नेण्याचा हा प्रवास यशस्वी ठरेल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

दरम्यान, येत्या १५ जानेवारी रोजी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *