जनतेला बुलेट ट्रेन हवी, पण आघाडी सरकारला नको, आघाडी सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या विरोधात…!

आघाडी सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्याच विरोधात आहे. महाराष्ट्राच्या जनतेला बुलेट ट्रेन हवी आहे, मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या त्रिकुटाच्या आघाडी सरकारला मात्र ती नको. असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला खडे बोल सुनावले.

“कोरोना व्हायरसचा प्रकोप संपल्यानंतर या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा सामान्य माणसाला, आणि महाराष्ट्राच्या जनतेला किती फायदा होईल याचा विचार करणे आवश्यक आहे. या प्रोजेक्टसाठी संपूर्ण कच्चा माल आणि मटेरिअल महाराष्ट्रात तयार करण्यात येणार आहे, या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, बुलट ट्रेन प्रकल्पाचा फायदा केवळ महाराष्ट्राच्याच जनतेला होणार आहे, यामुळे महाराष्ट्रात ५० हजार कोटी रुपये येतील, ही एक मोठी रक्कम आहे,” असे म्हणत त्यांनी या बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल सांगितले. मात्र आघाडी सरकार जनतेच्या विरोधात आहे, आणि त्यांना हा अतिशय फायदेशीर प्रकल्प नको, असे मत देखील फडणवीस यांनी व्यक्त केले.

यावेळी फडणवीसांनी महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना व्हायरसशी लढते आहे, त्यावर देखील प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले कि, “महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त रुग्ण का आढळले ? मुंंबई येथे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यु झाले. याचे कारण काय? या संपूर्ण कठीण काळात देखील महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला, घोटाळ्यांवर घोटाळे केले. त्यांच्यासाठी कोरोनाचे संकट महत्वाचे नव्हते तर काँट्रॅक्ट कोणाला मिळतो हे महत्वाचे होते. सध्या कोरोनाचे रुग्ण केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात कमी आढळताएत. विविध राज्यांनी आपल्या राज्यातील जनतेसाठी कोरोनाच्या पार्श्वयभूमी वर अनेक पॅकेजेच जाहीर केले. मात्र महाराष्ट्र एकमेव राज्य ठरले ज्यांनी असे कुठलेही पॅकेज जाहीर केले नाही.” असेही ते म्हणाले.

विजेच्या बिलाविषयी बोलताना ते म्हणाले कि, “हे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे. या सरकाने विजेच्या बिलाच्या नावाखाली लोकांना लुटले आहे. केंद्र सरकारने या बाबतील मोठा दिलासा दिला होता, मात्र राज्य सरकारने तो स्वीकारला नाही. का नाही स्वीकारला ? महाराष्ट्रातील सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, ऑटो रिक्शा चालकांना कुणालाच दिलासा मिळालेला नाही.

तसेच कोस्टल रोज विषयी ते म्हणाले कि, “आम्ही कोस्टल रोज बनविण्यासाठी अपार कष्ट केले आहे, केंद्र सरकार कडून सर्व परवानग्या आम्ही मिळवून दिल्या आहेत.”

एकूणच महाराष्ट्राचे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या मतांचा आदर करत नाही हे तर आधीच दिसून आले आहे, अन्यथा हे सरकार कधी स्थापन झालेच नसते. मात्र आता सत्तेत असून देखील या सरकारने जनतेच्या कल्याणासाठी आतापर्यंत काय केले असा प्रश्न इथे निर्माण होतो. फडणवीसांनी स्पष्ट केलेल्या परिस्थितीतून लक्षात येते कि, महाराष्ट्राच्या जनतेचे हाल होत आहेत, आणि कुणीच काही करु शकत नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *