ममता बॅनर्जींचा पराभव नाही, हा मोदी शहांचा लोकशाही विरोधी कट, संजय राऊत यांचे हास्यास्पद विधान !
पश्चिम बंगाल येथे भारतीय जनता पक्षाचा एकहाती विजय झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांचं सरकार आता पडलं आहे, आणि स्वतंत्र्यानंतर पहिल्यांदाच आता पश्चिम बंगाल येथे भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे, असे होत असताना, संजय राऊत यांनी हा ममता बॅनर्जी यांचा पराभव नाही, तर त्यांच्या पराभवासाठी मोदी आणि शहा यांनी सर्व यंत्रणांचा गैरवापर केला आहे, हा त्यांचा लोकशाही विरोधी कट आहे, असे हास्यास्पद विधान केले आहे.
बागंलमध्ये मोदी शहा यांनी इस्रायल इराण सारखी युद्ध परिस्थिती निर्माण केली आहे. सैन्य, आर्थिक दहशतवाद आणि अफवांच्या जोरावर, तसेच मतदार यादीतून नावे वगळून ममता बॅनर्जींना रोखण्याचा प्रयत्न झाला. “त्यांनी राजीनामा न देण्याचा घेतलेला निर्णय हा निवडणूक आयोग आणि सरकारच्या हुकूमशाही कृत्यांविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाचाच एक भाग आहे,” असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.
पश्चिम बंगाल येथे यावेळी रिकॉर्डतोड मतदान झाले आणि एकूण 92% मतदान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा एकहाती विजय झाला आहे. एकूण 207 जागांवर विजय मिळवून आता पश्चिम बंगाल येथे भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. आणि त्यामुळे विरोधकांनी एकूणच भाजपविरोधी सूर लावला आहे, असे यातून दिसून येते.
