
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे पुन्हा एकदा खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आणि शिवसेनेकडे विधानसभा अध्यक्ष पद येण्याची संभावना व्यक्त केली जात आहे. याचा साधा सरळ अर्थ असा कि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर पाणी सोडावे लागेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याविषयी चर्चेला उधाण आले असताना छगन भुजबळ यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत, तरी देखील राजकीय वर्तुळात महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदावर अजित पवारच असणार कि हे पद आणखी कुणाला मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत केलेली युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात पकडला आणि सत्ता स्थापन केली, यावेळी उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांना देण्यात आले. मात्र आता या पदावर टांगती तलवार असल्याची दिसून येते. आघाडी सरकार पुन्हा एकदा खाते वाटप करणार असून आताच्या परिस्थितीत बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे, तसे झाल्यास उपमुख्यमंत्री पद कांग्रेच्या हातात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद गमवावे तर नाही ना लागणार ? अशी शंका निर्माण झाली आहे.
एकूणच महाराष्ट्राची सद्य परिस्थिती पाहता महाराष्ट्रात राजकीय बदल होणे आवश्यक झाले असल्याचे दिसून येत आहे. मग ते कोरोनाची महाराष्ट्रातील परिस्थिती असू देत, पालघर साधू लिंचिंग प्रकरण असू देत किंवा आता शरजील उस्मानी चे हिंदूंविरोधात आक्षेपार्ह विधान, सरकारने महत्वाची पावले उचलणे आवश्यक आहे. त्यामुळे या खातेवाटपानंतर महाराष्ट्राच्या परिस्थितीत काय बदल होतो, हे बघणे महत्वाचे आहे.
