
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अनिल देशमुख यांना १०० कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणी ईडी ने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले होते, मात्र अनिल देशमुख कोरोनाचे वातावरण आणि आजारपण अशी कारणे देऊन या चौकशीसाठी हजर राहण्यास टाळताएत, व्हिडियो कॉन्फरेंसिंगच्या माध्यमातून हजर राहण्यास त्यांनी सम्मती दर्शविली आहे. आता पर्यंत देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटक झाली असल्याने आता देशमुखांची पाळी तर नाही ना ? असा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे. ईडीच्या या चौकशी प्रकरणाचे राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, आणि हा पक्ष सत्तेत असल्याने महाराष्ट्राच्या सरकारवर देखील आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही, असे स्पष्ट झाले आहे.
ईडीने २५ जून रोजी समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रे मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. आजही (२९जून) मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी, अशी मागणी अनिल देशमुखांनी पत्राद्वारे केली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे हा क्राईम इंटिलिजन्स यूनिटचे प्रमुख होते. गेल्या काही महिन्यात (तत्कालीन) गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेला त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले, अशी माहिती या पत्रातून देण्यात आली. यानंतर उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाची चौकशी ईडीकडून केली जात आहे.
हे संपूर्ण प्रकरण सुरु असताना, हे विसरणे शक्य नाही कि महाराष्ट्राची जनता ज्यावेळी कोरोनामुळे हैराण होती, अनेकांनी आपल्या घरातील महत्वाची व्यक्ति गमावली, घरातील कर्तीमंडळी कालवश झाली, त्यावेळे अनिल देशमुख आणि त्यांचा पक्ष वेगळ्याच कामात गुंतले होते. परमबीर सिंह यांचे आरोप खरे ठरले हे पक्ष केवळ भ्रष्टाचारासाठी सत्तेत आले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आता पुढे काय होते ? देशमुख यांची अटक होते का ? ईडीच्या तपासातून काय निष्पन्न होते, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
