“महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. भंडारा, गोंदिया जिल्हापरिषदेच्या निवडणूकीत भाजपला मिळालेलं भरगोस यश याची जनतेच्या या विश्वासाची पावती आहे. आणि यासाठी मी महाराष्ट्राच्या जनतेचा आभारी आहे.” असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत तो पक्ष आज चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राची जनता या तीन पायांच्या सरकारमुळे त्रस्त आहे, आणि जनतेने आपल्या मतांमधून हे पुन्हा एकदा सिद्ध केले, असे देखील ते यावेळी म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना भाजपला जितकी मतं मिळाली होती, त्याहूनही ६५ मतं अधिक यावेळेला मिळाली आहेत. यासाठी मी महाराष्ट्राच्या जनतेचा आभारी आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले. भंडारा आणि गोंदिया येथे जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला भरगोस यश मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेने भापला निवडले आहे, आणि भाजपच महाराष्ट्रातला नंबर १ पक्ष आहे हे सिद्ध केले आहे.
यावेळेला बोलताना फडणवीस ओबीसी आरक्षणावरून देखील बोलले, ते म्हणाले कि, “आज ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात तोंडावर पडले आहे. हे आरक्षण लवकर बहाल व्हावे अशी आमची मागणी आहे.” असेही त्यांनी येथे स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने मविआ सरकारला ओबीसी आरक्षणासंबंधी डेटा मागितला आहे. त्यावरुन पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणासंबंधी चर्चेला उधाण आले आहे. आता या संबंधात पुढे काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
