
शिंदे सरकारने ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत शिंदे सरकारने निर्णय घेतला आहे कि, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका 2017च्या वॉर्ड संरचने प्रमाणेच होणार आहेत. आणि मविआ सरकारने वाढवलेल्या 9 वॉर्ड्सना रद्द करण्यात आले असून आता निवजणूक ही 2011 च्या जनगणनेनुसार आणि 2017च्या वॉर्ड संरचनेनुसारच होणार आहे. वाढवलेले वॉर्ड हे नियमबाह्य असल्याने त्यांना रद्द करण्यात आले असल्याची माहिती शिंदे सरकारने दिली आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का लागला आहे.
मुंबईतील वाढवलेले नऊ वॉर्ड रद्द
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईतील वॉर्डरचना नऊने वाढवून ती 227 वरुन 236 वर नेली होती. त्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध केला होता. वाढवलेले नऊ वॉर्ड हे शिवसेनेच्या फायद्यासाठी असल्याचा आरोपही भाजपने त्यावेळी केला होता. आता शिंदे सरकारने हे वाढवलेले नऊ वॉर्ड रद्द केले आहेत.
राज्याताली जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या वॉर्ड रचनेमध्येही बदल करण्यात आला होता. अनेक ठिकाणी नवीन वॉर्डची रचना करण्यात आली होती. आता ते वाढवलेले नवीन वॉर्डही रद्द करण्यात येत आहेत.
