तुम्ही तर नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून जेलमध्ये घालते, मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा…! : शिंदेचा ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे. नुकतेच विधानसभेत ते म्हणाले कि, “मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा, तुम्ही तर नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उचलून जेलमध्ये टाकले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी कधीच गद्दारी केली नाही, उलट आम्ही तर त्यांचे विचार पुढे नेले.” असे ते म्हणाले. विरोधी पक्षाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘कंत्राटी मुख्यमंत्री’ असे लेबल देण्यात आले, त्याला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे.



रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “नीती आयोगाच्या बैठकीला गेलो असताना मी त्या ठिकाणी अनेक मुद्दे मांडले. मी मागे तिसऱ्या रांगेत उभा होतो त्यावरुन टीका केली. पण रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं आहे. मी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला गेलो असताना पहिल्या रांगेत होतो, त्याबद्दल कोणी काही बोललो नाही. इंदिरा गांधींचा मी फॅन होतो, त्यांनी डॅशिंग काम केलं. पण आताच्या पंतप्रधानांनी देशाचा डंका जगभरात बजावला. मग अशा माणसाला भेटायला जायचं तर रांग का बघायची?”


एक से भले दो, आता आम्ही दोघे आहोत:

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना ते एकटे सर्वांना पुरुन उरायचे. देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन असं म्हणायचे. देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि ते मलासुद्धा घेऊन आले. आता तर आम्ही दोघे आहोत, ‘एक से भले दो’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.