
ही लोकं आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र, शिवसेना कोणाच्या बापाची नाही. आम्ही वर्षानुवर्षे काम करून शिवसेना वाढविली आहे, असं वक्तव्य शिवसेनेच्या बंडखोर खासदार भावना गवळी यांनी केलंय.
“ही लोकं आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र, शिवसेना कोणाच्या बापाची नाही. आम्ही वर्षानुवर्षे काम करून शिवसेना वाढविली आहे. 40 आमदार आणि 12 खासदार का सोडून गेले, याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोला यावेळी भावना गवळी यांनी उद्धव ठारे यांना लगावला.
भावना गवळी म्हणाल्या, या मतदारसंघात पुन्हा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ दिली. देवेंद्र फडणवीस ही त्यांच्या सोबत होते. अडचणीच्या काळात ज्यांनी मदत केली नाही, त्यांना आठवू इच्छित नाही. मात्र अडचणीत असताना ज्यांनी मदत केली त्यांची साथ कधीच सोडणार नाही. 25 वर्षात अनेक विकास कामे केली, मात्र अजून ही अनेक कामे शिल्लक आहेत. पिण्याच्या पाण्याच्या योजनेची उंची वाढविण्याची गरज आहे, विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याची गरज आहे.
