ब्रिटेनच्या सर्वोच्च पदावर एक हिंदू प्रस्थापित..!

ब्रिटेन आपल्या भारतावर दीडशे वर्षे राज्य केले आणि आता ब्रिटेनच्या सर्वोच्च पदावर एक भारतीय वंशाचा एक हिंदू व्यक्ति ऋषि सुनक हे विराजमान झाले आहेत. ऋषि सुनक यांनी काल मंदिरात जाऊन आराध्य देवतेचे दर्शन घेत संपूर्ण भारतीय समाजाला गौरवाचा एक क्षण दिला आहे.


युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्याने भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे माजी चॅन्सलर ऋषी सुनक आणि कॅबिनेट मंत्री पेनी मोरडाऊंट यांच्यात लढत झाली आणि अखेर सुनक यांना बहुतांश खासदारांचा पाठींबा मिळाल्याने ते आता ब्रिटेनचे नवीन पंतप्रधान असणार आहेत.



ऋषी सुनक यांचा जन्म यांचा जन्म १९८० मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये झाला. ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या सुनक यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक ( Rishi Sunak ) यांनी इन्वेस्टमेंट बँक असलेल्या गोल्डमॅन सॅकमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी एक गुंतवणूक कंपनीदेखील स्थापन केली होती. पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला ऋषी सुनक. मागच्या वर्षी ते रिचमंडमधून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेले.अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत.

संपूर्ण भारतासाठी ही एक अत्यंत गौरवाची बाब आहे, आणि हा एक अतिशय महत्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.