वूमन्स प्रीमिअर लिगच्या सलग दुसऱ्या सामन्यात विजयासाठी 200 पेक्षा अधिक धावांचं विजयी आव्हाने देण्यात आलं आहे. मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मॅच खेळवण्यात येत आहे. या सामन्यात तोडफोड बॅटिंग करत दिल्लीने बंगळुरला विजयासाठी 224 तगडं आव्हान दिलं आहे. दिल्लीकडून शफाली वर्माने 84 तर कॅप्टन मेग लॅनिंगने 72 धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मारिजाने कॅप हीने मोठे फटके मारले. तसेच जेमिमाह रॉड्रिग्सने हीनेही आरसीबीच्या गोलंदाजांना चोपलं बंगळुरुकडून हेदर नाइट हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
दिल्ली कॅपिटल्सच्या या दोन्ही खेळाडूंनी महिला प्रीमियर लीग च्या इतिहासात पहिल्या विकेटसाठी किंवा कोणत्याही विकेटसाठी 100 आणि 150 धावांची पहिली भागीदारी करण्याचा विक्रमही केला आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सने पहिल्याच सामन्यात दाखवून दिले आहे की त्यांच्याकडे फलंदाजीत किती ताकद आहे. दिल्लीची पहिली विकेट मॅग लॅनिंगच्या रूपाने 162 धावांवर पडली आणि दुसरी विकेट शेफाली वर्माच्या रूपाने 163 धावांवर पडली. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची खेळाडू मारिजन कॅप आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी दिल्लीच्या धावसंख्येचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करण्याचे काम केले. सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून बंगळुरुची कर्णधार स्मृती मानधनाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निरणय घेतला. दिल्लीला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य पूर्ण करण्याचा त्यांचा डाव आहे. पण दिल्लीच्या धमाकेदार फलंदाजीमुळे एक अत्यंत मोठं लक्ष्य आता आऱसीबी संघाला मिळालं आहे. पण आरसीबी संघातही स्टार खेळाडूंचा भरणा असल्याने एक चुरशीची लढत नक्कीच पाहायला मिळू शकते.
