रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ मधील फ्रेश जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. लव रंजन दिग्दर्शित हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट होळीच्या दिवशी ८ मार्च रोजी प्रदर्शित झाला. ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गाजत आहे. यासोबतच चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. त्याचबरोबर ‘तू झूठी मैं मक्कारच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.
रणबीर कपूर-श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन केले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी चित्रपटाने भारतात 15.73 कोटी रुपयांची कमाई केली.वीकेंडला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना रोमान्स, अॅक्शन, कॉमेडीचा तडका बघायला मिळणार आहे. या चित्रपटामधील रणबीर आणि श्रद्धा यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. चित्रपटामधील काही इमोशनल सीन्समधील रणबीरच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटात स्टँड-अप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सी, डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. बोनी कपूर यांनी या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन लव्ह रंजन यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.
