गंभीर दुखापतीवर मात करुन अमिताभ बच्चन पुन्हा शूटिंगसाठी सज्ज

मेगास्टार बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन हे हैदराबाद येथे चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुर्घटनेत जखमी झाले होते. त्यांचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ च्या साहसी दृश्यांचे हैदराबादच्या सेटवर चित्रीकरण करत असताना हा अपघात घडला. या अपघातादरम्याने अमिताभ यांचे बरगड्या तुटल्या त्यामुळे ते आता मुंबईच्या घरी उपचार घेत आहे. अशी माहिती स्वत: अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर दिली. मात्र आता पुन्हा अमिताभ यांनी तब्येतीविषयी अपडेट ब्लॉगमधून दिली आहे. अमिताभ बच्चन तब्येतीविषयी नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका फॅशन शोदरम्यानचा रॅम्पवर चालतानाचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी काळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता आणि पायझमा परिधान केलेला दिसत आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, “माझ्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद… आता माझी तब्येत ठीक असून लवकरच याच जोशात मी पुन्हा रॅम्पवर येईन, अशी आशा आहे.”

अमिताभ बच्चन यांचा ‘प्रोजेक्ट के’ हा सध्या मनोरंजनविश्वातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा चित्रपट 2 भागात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात कथेत सस्पेन्स पाहायला मिळणार असून दुसऱ्या भागात त्यामागची कथा सांगितली जाणार आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असून, त्याचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत. सध्या या चित्रपटाचा पहिला भाग पूर्णपणे तयार झाल्याचे बोलले जात आहे. तिन्ही कलाकार यावेळी एक हटके भूमिकेत दिसणार आहेत.