सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांबाबत आजची सुनावणी महत्त्वपूर्ण असणार आहे. निवडणुका लांबणीवर पडणार की सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.
23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत. गेल्या दोन तीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या या निवडणुका लांबणीवर पडल्यात.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्या चार महिन्यांपासून आहे. त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुप्रीम कोर्टानं मविआ सरकारची वॉर्डरचना मान्य केली तर कदाचित निवडणुकांचा मार्ग मोकळा होईलही. पण 23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग त्या दोन टप्प्यांत घेऊ शकतं, काही पावसाळ्याआधी आणि काही पावसाळ्यानंतर दुसरी शक्यता म्हणजे जर शिंदे सरकारची वॉर्डरचना कोर्टानं मान्य केली तर मग नव्यानं प्रक्रिया करण्यासाठी निवडणूक आयोगाला काही काळ लागेल. त्यामुळे या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. मुंबई- पुण्यासारख्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबरपर्यंत जाऊ शकतात.
