बॉलिवूडमधील खिलाडी अशी ओळख असणारा अक्षय कुमार हा लवकरच त्याच्या ‘बडे मियां छोटे मियां’ या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षय हा सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटामधील एका अॅक्शन सीनचं शूटिंग करण्यासाठी अक्षय हा स्कॉटलँड येथे गेला होता. यावेळी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली आहे. अक्षयच्या गुडख्याला दुखापत झाली आहे.
“अक्षय कुमार टायगरसोबत ॲक्शन सीनचे शूटिंग करत होता, त्या दरम्यान अक्षयला एक स्टंट करताना ही दुखापत झाल्याचे कळत आहे. त्याच्या गुडघ्यावर सध्या ब्रेसेस आहेत.” परदेशातील शूटिंग वेळात पूर्ण व्हावे यासाठी अक्षय क्लोज-अप्ससह शूट करत आहे. मात्र सध्या शूटचा महत्वाचा ॲक्शन भाग थांबवण्यात आला आहे. गंभीर दुखापत नसल्यामुळे अक्षयने शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. अक्षयच्या दुखापतीमुळे चित्रपटातील अॅक्शन सीन्सचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. सध्या खिलाडी कुमारचे चित्रपटातील अन्य सीन्स शूट करण्यात येत आहेत.
