नॉट रिचेबलची चर्चा आणि सकाळी आठ वाजताच अजित पवार सराफ दुकानात हजर

पुणे : नॉट रिचेबलची चर्चा सुरू झाली आणि सकाळी आठ वाजताच अजित पवार खराडी येथील सराफ दुकानात हजार झाले. फिट कापून या दुकानाचे त्यांनी उद्घाटन केले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काल अचानक नॉट रिचेबल झाल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अनेकांना पुन्हा पहाटे झालेल्या शपथ विधीची आठवण झाली.

शिवसेनेतील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या वादाचा संदर्भही जोडला जाऊ लागला. अजित पवार काल पुण्यात होते. मात्र, दुपारनंतर अचानक ते काही आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत त्या आधी अचानक अशाप्रकारच्या घडामोडी घडल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.
मात्र, पवार यांनी पुण्यातील त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. ९ आमदार घेवून गायब या अफवा असल्याचे सांगताना ते म्हणाले. आपण नॉट रिचेबल नव्हतो तर, तब्येतीच्या कारणामुळे आपण नियोजित दौरे रद्द केले होते.