डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी ( १६ एप्रिल ) ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
खारघर येथील मैदानावर झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमाला धर्मधिकारी यांचे लाखो अनुयायी दाखल झाले होते. अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरु होते.
त्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती राज्य सरकारने नियुक्त केली आहे.
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती असेल. एक महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करेल. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाबद्दल कोणत्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे, याबाबतही ही समिती सरकारला शिफारस करणार आहे.
