जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुलाबराव पाटील हे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी शिवसेनेचे काम सुरू केले आणि एका पानटपरी चालकापासून ते तीनदा मंत्री झाले आहेत.
गुलाबराव पाटील हे वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. आता हा अवेळी पडणारा पाऊस आहे. त्यामुळे आम्ही तर हे सरकार आल्यापासून पंचनाम्यामध्येच गुंग आहोत. इकडे आल्यानंतर ब्रेक के बाद पण गारपीट सुरू आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील राजीनामा नाट्यावरही भाष्य केलं. पक्ष जे सांगेल तेच नेता करत असतो, तेच काम शरद पवारांनी केलंय. शेवटी ती त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे, त्यांच्या पक्षाला जे वाटलं ते त्यांच्या कोअर कमिटीने केलं, असं त्यांनी सांगितलं.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात चर्मकार समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात गुलाबराव पाटील बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले की, हे सरकार आल्यापासून पंचनाम्यामध्येच गुंग आहोत. इकडे आल्यानंतर ब्रेक के बाद पण गारपीट सुरू. आमचं सरकार आल्यापासून लोकच नाही तर देवही विस्कळीत झाले आहेत. असे गुलाबराव पाटील म्हणाले.
