बारसुत रिफायनरी प्रकल्पावरून सध्या राजकारण केले जात आहे प्रकल्पास्थळी सुरू असलेल्या नेत्यांच्या भेटीसाठी रिफायनरी वरून विविध राजकीय पक्ष आपली बाजूमांडत आहेत कुणाचा विरोध तर कोणाचा मध्यममार्गी भूमिका दिसून येत आहे.बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पोलीस बळाचा वापर करून प्रकल्प रेटवून नेण्याचा प्रयत्न न करता स्थानिकांशी संवाद साधून पुढील निर्णय घेतला जाईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. गेले चार दिवस बारसू परिसरातील घडामोडींचा सामंत यांनी शनिवारी जिल्हाधिकारी देवेंद सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकीत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, या परिसरात मातीसाठी ड्रिलिंगचे काम येत्या ९ ते १० दिवसांत पूर्ण होईल. ही माती जागतिक पातळीवरील कंपनीकडे तपासणीसाठी पाठवली जाणार आहे.
उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका
उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरीसंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे हे दुटप्पी भूमिका घेत आहे कारण बारसूत रिफायनरी व्हावा या संदर्भातील पत्र उद्धव ठाकरे यांनीच केंद्राला पाठवले होते. आता मात्र या प्रकल्पाला ते विरोध करत आहेत त्याचवेळी या रिफायनरीमध्ये देशातील सर्वाधिक गुंतवणूक होणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते कोणत्याही प्रदूषणाशिवाय हि रिफायनरी काम करणार आहे ही ग्रीन रिफायनरी असणार आहे मात्र केवळ राजकारणासाठी या रिफायनरीला विरोध केला जात आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
त्यांच्याकडून माती परीक्षणाच्या अहवालानंतरच प्रकल्प होणार की नाही ते ठरणार आहे. मात्र त्याआधी विरोध नको मात्र या विषयावर सर्व संबंधितांशी चर्चा करून सामोपचाराने तोडगा काढण्याचे शासनाचे धोरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना त्रास देण्याचा कोणताही प्रयत्न नाही. संयमाने चर्चेतून हा विषय हाताळण्याचा आमचा प्रयत्न आहे. या परिसरात झालेल्या जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांच्या तक्रारींबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमून याची चौकशी केली जाईल, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
