आयपीएलचा 52 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. राजस्थान रॉयल्स संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. राजस्थान रॉयल्सने या मोसमाची सुरुवात चांगली केली होती, मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये संघाला विजयाची लय कायम राखता आली नाही.आयपीएलमधील प्लेऑफचा मार्ग सोपा करण्यासाठी राजस्थानला हैदराबाद विरुद्ध सामना जिंकावा लागेल. चालू आयपीएल सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सकडे एक संतुलित संघ आहे. मधल्या फळीतील फलंदाजांच्या खराब कामगिरीचा राजस्थान टीमला मागच्या दोन सामन्यात फटका बसलाय.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद एकूण 17 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने आठ सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्स संघाने नऊ सामने जिंकले आहेत. आयपीएल 2023 मध्ये या दोन संघांमध्ये सामना झाला असून यामध्ये राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. पराभवाचा वचपा काढण्याची संधी आज हैदराबाद संघाला मिळणार आहे.
राजस्थान रॉयल्सने गेल्या सामन्यात उंचपुऱ्या जेसन होल्डर याच्या जागी एडम झॅम्पा याला संधी दिली होती. मात्र राजस्थानचा हा डाव चांगलाच फसला होता. तर राजस्थान पुन्हा एकदा रियान पराग याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी देऊ शकते. राजस्थान प्लेइंग इलेव्हनमध्ये रियान पराग याच्या जागी कुणार राठोड किंवा आकाश वशिष्ठ या दोघांपैकी एका कुणाला संधी देऊ शकते.
सनरायजर्स हैदराबाद टीम मॅनेजमेंट राजस्थानची खेळपट्टी पाहता संघात भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी आणि टी नटराजन या तिकडीपैकी कुणा दोघांना नक्कीच स्थान देईल. कदाचित कार्तिक त्यागी याला डच्चू मिळू शकतो, कारण त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खूप धावा लुटवल्या होत्या. याशिवाय मार्को यानसन आणि अकील हुसेन या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखव्यात येऊ शकतो.
राजस्थान रॉयल्स संभावित प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, जेसन होल्डर, आर अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेन्ट बोल्ट आणि संदीप शर्मा.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम, हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, मार्को यानसन/अकील हुसैन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि कार्तिक त्यागी.
