शरद पवारांना धमकी प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिस आयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश

सौरभ पिंपळे यांच्या ट्विटर अकाउंट वरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यासंदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली

मुंबई पोलीस आयुक्तांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासास्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित ट्विटर हॅण्डलची शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. जवळपास पाऊण तासाची ही भेट होती.

कोणत्याही नेत्याला धमकी देणं खपवून घेतलं जाणार नाही फडणवीस दरम्यान शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमक्या देणे किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चितपणे कारवाई करतील, यासंदर्भात आक्षेपार्ह ट्विट करत धमकी दिली यावर तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

राजकिय क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पवार यांच्यासारख्या व्यक्तीला धमकी देणाऱ्यांना तात्काळ अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे पवारांसारख्या वरिष्ठ नेत्याला धमकी देणे योग्य नाही राज्य सरकारकडून योग्य कारवाई करण्यात यावी असेही बावनकुळे म्हणाले आहे धमकी देणारा व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असला तरी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असा प्रकार करणाऱ्या वर कठोर कारवाई झाली पाहिजे.

नागपूरमध्ये नितेश राणे प्रसार माध्यमांशी बोलत होते. शरद पवार महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ती सरकार घेत आहे. आम्ही काही उद्धव ठाकरेसारखे घरी बसून राज्याचा कारभार चालवत नाही, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. मात्र आम्ही असे करणार नाही, असे राणे म्हणाले.