सर्वसामान्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासन आपल्या दारी, एका क्लिकवर मिळणार शासकीय योजनांची यादी

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने प्रत्येक योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळण्यासाठी व गोरगरिबांना आत्मनिर्भर आणि सक्षम करण्यासाठी शासन आपल्या दारी योजनेची सुरुवात केली आहे.
शासन आपल्या दारी’ योजनेचा आढाव सोमवारी सह्याद्री अतिथिगृह येथे घेतला. यावेळी या अभियानाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे यांनी सादरीकरण केले. एमकेसीएलतर्फे विवेक सावंत यांनी महालाभार्थी पोर्टलचे सादरीकरण केले.याची व्याप्ती आणखी वाढवून महिलांसह अन्य लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळावा याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त नागरिकांना सहज सुलभ लाभ मिळावेत म्हणून या पोर्टलचा उपयोग करण्याबाबत त्यांनी सूचना केली.
मुख्य सचिव मनोज सौनिक, अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ( एमकेसीएल) यांनी ‘महालाभार्थी हे पोर्टल तयार केले आहे.
नागरिकाने या पोर्टलमध्ये स्वतःची माहिती सादर केल्यानंतर, कोणत्या शासकीय योजनांसाठी हा नागरिक पात्र ठरू शकेल याची संभाव्य यादी उपलब्ध होते. प्रत्येक योजनेसाठी नागरिकाने कोठे संपर्क साधणे अपेक्षित आहे व आवश्यक कागदपत्रे कोणती, याचीही माहिती नागरिकास मिळते. यामुळे नागरिकांना सहजपणे संबंधित योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
सरकार स्वयंसेवक नियुक्त करणार राज्यातील जनतेने जवळच्या प्राधिकृत केंद्रावर जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नागरिक घेऊन जातील याची दक्षता घेणे, छापील अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मदत करणे, केंद्रावर येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी प्रयत्न करणे, यासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत. नागरिकाला योजनांची माहिती देणारे पत्र मिळाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष योजनांचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा यासाठी काही स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून हे स्वयंसेवक नागरिकांना याकामी मदत करतील.

योजना काय असतील :
कृषी सेवा केंद्राचे परवाने
सेवानिवृत्त लाभ
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट
ई-श्रम कार्ड
भरती मेळावा
पीएम किसान
विवाह नोंदणी
पीएफ घरकुल योजना
मनरेगा
जॉब कार्ड
मुलींना सायकल वाटप
नवीन मतदार नोंदणी
शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
कृषी प्रदर्शन
डिजिटल इंडिया
सखी किट वाटप
दिव्यांग साहित्य वाटप
शिकाऊ चालक परवाना
यावितिरिक्त वेगवेगळ्या योजनांचा यात समावेश असणार असून, ह्याच योजना आता आपल्या दारी येणार आहे.
शासन आपल्या दारी योजनेतून मिळणार 2 लाख रुपये
शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत या योजनेत दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे राज्य शासनाचा हा नवा उपक्रम आहे
शासन आपल्या दारी उपक्रमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी होऊ अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना या उपक्रमांतर्गत लाभ दिला जाणार आहे
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना देण्यात येत आहे. या योजनेची माहिती सामान्यांना व्हावी व लाभ घेण्यासाठी आवश्यक के कागदपत्रे काय लागतील ही माहिती स्वयंसेवकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ही देशातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण विमा योजना आहे . या योजनेतून कमी रकमेत विमा संरक्षण देण्यात येते या योजनेचा कालावधी एक जून ते 31 मे असा आहे. योजनेत सहभागी झालेल्या विमाधारकास 18 ते 50 वर्षाच्या कालावधीत कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास दोन लाख रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाते. एका वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात व जीवन विमा योजना आहे.
जीवन ज्योती विमा योजना दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक असून बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ व इतर विमा कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचलन केले जाते. 18 ते 50 वयोगटातील सर्व बचत बँक खातेदारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. त्यानंतर एका व्यक्तीचे अनेक बचत खाते जर असतील तर अशा व्यक्तीने कुठल्याही एका बचत खात्या द्वारे हा विमा उतरू शकतात. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल. ऑटो डेबिट सुविधा सुद्धा या योजनेअंतर्गत उपलब्ध असणार आहे. विमा हप्ता रुपये 436 प्रति वर्ष राहणार आहे. त्यानंतर विमाधारक वय वर्ष 55 पूर्ण केल्यावर बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसेल तर बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्टात येईल . या योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका सर्व खाजगी बँका ठाणे जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँका यापैकी कोणत्याही बँकेत आपले बचत खाते असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर या योजनेचा लाभ देण्यासाठी 30 जून पर्यंत मोहीम राबवण्यात येत आहे.

योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कार्यक्रम शहरात होणार आहे 75000 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना या योजनेतून फायदा होणार आहे असा दावा प्रशासनाने केला आहे.यात आठ कृषी विभागांशी निगडित योजना आहेत महसूल खात्याच्या सहा योजना पशुसंवर्धन विभागाच्या दोन रोहियो दोन कुशल मनुष्यबळ विकास विभाग तीन सामान्य प्रशासन विभाग तीन तर उर्वरित योजना महिला व बालकल्याण विभाग आयटी विभागाशी निगडित आहे.

योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये
सर्व प्रशासन हर घर दस्तकच्या माध्यमातून प्रत्येकाला योजनाची माहिती देणार आहे अशा प्रकारचे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत शासन आपल्या दारी या अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना एका छताखाली लाभ देण्यात येणार आहे त्याच्यानंतर शासकीय निर्धारित शुल्कात 200 हून अधिक योजनांचा लाभ कमीत कमी कागदपत्रे आणि जलद मंजुरी अशा पद्धतीने करण्यात येणार आहे.