अजित पवार नाराज असलेल्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होत्या ते पक्ष सोडण्याची जास्त शक्यता वर्तवली जात होती काल म्हणजे (2 जुलै) त्या चर्चना पूर्ण विराम मिळाला आहे.अशी परिस्थिती राज्याच्या राजकारणात काल निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थ असलेल्या अजित पवार काल राष्ट्रवादीला हादरा दिला राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला.रविवारी सकाळपासून राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठका अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी सुरु होत्या.या बैठकीनंतर अजित पवार काही आमदारांसह राजभवनाच्या दिशेने जात असल्याची माहिती समोर आली त्यामुळे राजकीय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.रविवार शपथविधी पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे.अजित पवार यांनी बंड केलं आहे. रविवारी राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींचा सर्वाधिक फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे. एकच चाल खेळून देवेंद्र फडणवीसांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. भाजपाने महाविकास आघाडीला कमकुवत केलय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पर्याय निर्माण केला आहे तसंच 2024 लोकसभा निव़डणुकीसाठी पक्षाची स्थिती अजून बळकट केलीय.
अजित पवार यांच्याकडून हालचाली सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सोबत भाजपचे मंत्री राजभवनात दाखल झाले होते.एकंदरीत अजित पवार हे स्वतंत्र गट घेऊन भाजपमध्ये सामील होणार की अन्य कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिले होते.गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार अनेक विषयांमुळे चर्चेत आहेत.त्याचबरोबर काल रविवारी शरद पवार यांनी शक्यता खोडून काढली होती.मात्र त्यानंतर काही वेळातच अजित पवारांसह राजभवनात 8 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला राज्यात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना धक्का बसला रविवारी पत्रकार परिषद घेत 42 आमदारांसह अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे.
रविवार (2 जुलै) हा राज्यातील राजकीय उलथापालथीचा दिवस होता.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात भाजपला वरचढ ठरले आहे.अजित पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे तीन इंजिनाचे सरकार असल्याचे सांगून त्यांचे स्वागत केले असून आता त्यांच्या सरकारला ट्रिपल इंजिन मिळाल्याचे सांगितले आहे.
भाजपाने महाराष्ट्रात मिशन 2024 लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याच टार्गेट ठेवलं आहे. शिंदे गट सोबत येऊनही उद्दिष्टय साध्य होईल,अशी स्थिती नव्हती.अजित पवार यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी निश्चित कमकुवत झाली आहे.त्याचा फायदा भाजपाला महाराष्ट्राच्या अन्य भागात होऊ शकतो.राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत स्थिती असलेल्या 11 लोकसभा मतदारसंघात भाजपाला फायदा होऊ शकतो.राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात एक पूर्ण वेगळा मतदार आहे. त्यांच्या नेत्यांना सोबत घेतल्यामुळे तिथे मविआला फटका बसेल.पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आम्हाला प्रवेश करता येऊ शकतो.
राज्यातील या राजकीय उलथापालथीमुळे केंद्रातील मोदी सरकारलाही मोठा दिलासा मिळाला आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी शिल्लक आहे आणि त्याआधीच राज्यातील राजकीय उलथापालथ भाजपच्या बाजूने झाली आहे. अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी अर्थात एनडीएमध्ये सामील करून मोठा दिलासा दिला आहे. अजित पवारांच्या या बंडामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला कसा फायदा होईल?
राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत,ज्या उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा नंबर आहेत.राज्यात राष्ट्रवादीची चांगली पकड आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षांच्या संभाव्य महाआघाडीचे शिल्पकार मानले जात आहेत. दरम्यान, त्यांच्या कुटुंबातच तेढ निर्माण झाला लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आल्यास भाजपला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आधी शिवसेनेत आणि आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये दोन गट पडले आहेत. शिवसेनेतील शिंदे गट आधीच एनडीएसोबत आहे.आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात अजित पवारांच्या पाठिंब्याने राज्यातील भाजपची ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या बंडखोरीकडे भाजपसाठी मोठा दिलासा मिळू शकतो.यावेळी विरोधकांना लोकसभेत एकही जागा जिंकणे कठीण’
अजित पवार यांच्या युतीचा भाग झाल्यानंतर एकनाथ शिंदे स्वतः म्हणाले मंत्रिमंडळात जागावाटपावर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे.महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना 4-5 जागा मिळाल्या.पण यावेळी त्याही मिळू शकणार नाहीत. विरोधकांना एक जागा मिळणे कठीण होईल.
अजित पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याने भाजपाकडे एकनाथ शिंदे यांना पर्याय तयार झाला आहे. त्यामुळे सरकारला आता कुठलाही धोका राहणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. एकनाथ शिंदे भाजपासोबत आल्यानंतर म्हणावा तितका परिणाम होत नव्हता. म्हणजे फायदा दिसत नव्हता. मागच्या महिन्यात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याची कल्पना दिली होती.
