राज्यातील सत्तांतरानंतर राजकारण दिवसेंदिवस वेगळं वळण घेत आहे.आज अजित पवारांनी बैठक बोलवली होती. वांद्रे भागातील एमईटी मैदानावर ही बैठक पार पडली. या बैठकीतील धनंजय मुंडेंचे भाषण चर्चेत आले आहे.त्यांनी अजित पवारांचे तोंड भरून कौतुक केल्याचे यावेळी दिसून आले आहे. या बैठकीतून अजित पवारांचा झालेला अपमान या मुद्द्यावर नेत्यांनी भर देत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. या बैठकांनी राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे.अजित पवार यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या बैठकीत अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी केली.
धनंजय मुंडे म्हणाले की,आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला आहे. तसेच अजित पवारांनी सर्वात जास्त ठेचा खाल्ल्या असून त्यांना सगळ्यात जास्त वेळा मान खाली घालावी लागली आहे. अजित पवारांवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. मात्र तरीही त्यांनी हे अपमान सहन केले आहेत. हे अपमान सहन करत असताना त्यांनी त्यांच्या सावलीलाही कळू दिले नाही. नेहमी त्यांच्यावर टीका झाली, मात्र शरद पवारांसाठी त्यांनी सगळं सहन केलं आहे, असे मुंडे यावेळी म्हणाले.
मुंडे म्हणाले की आपण अनेक वर्ष साहेबांची सेवा केली. साहेब विठ्ठल आणि आपण वारकऱ्यासारखं राहिलो. मी या प्रसंगातून याआधी गेलोय.त्यामुळे आता काय वाटत असेल हे मी समजू शकतो.शेवटी साहेबांना देखील स्वाभिमानासाठी निर्णय घ्यावा लागला होता.साहेबांचे सर्व सहकारी आमच्याोबत आहे.काही 2-4 जण तिकडे असून भुजबळ साहेबांनी त्यांना योग्य असा बडवे हा शब्द वापरला आहे.
मुंडे पुढाले म्हणाले की आज माझं मन रडत असून माझ्या डोळ्यात अश्रू दिसत नाहीत.किती वेदना अजितदादांनी साहेबांसोबत असताना सहन केल्या असतील. आपल्या मनाला विचारुन सांगा,व्यासपीठावरील एक तरी व्यक्ती साहेबांचा थुका तरी ओलांडू शकतो का? आयुष्यभर राजकारण करताना दादांनी कधी साहेबांचा शब्द ओलांडला नाही.ज्या व्यक्तीने सर्वात जास्त अपमान भोगला असेल, सगळ्यात जास्त मान खाली जावी लागली असेल, सगळ्यात जास्ता ठेचा खाव्या लागल्या असतील तर त्याचे नाव म्हणजे अजितदादा पवार होय.
माझ्यासारख्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला पक्षातून हाकलेलेल्या माणसाला इथे बोलायची संधी फक्त अजितदादांमुळे मिळाली आहे.एवढ्या प्रसंगानंतर ही वेळ येते आहे, तर ती का येते याचा उलगडा झाला पाहिजे.अजितदादा तुम्ही तुमचं मन मोकळं करावं.एकदा हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलं पाहिजे.असे मुंडे म्हणाले.
