जे घरी बसून काम करतात, त्यांना जनता घरीच बसवते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक येथे आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले होते, या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांना दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका देखील केली. नाशिकमध्ये आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जे घरी बसून काम करतात, त्यांना जनता घरीच बसवते, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना हल्लाबोल केला आहे. ‘लोकांच्या दारोदारी सरकार फिरतंय, अशी टीका काही विरोधक करू लागलेल आहेत. खरं म्हणजे घरी जे बसतात, घरातून काम करतात. त्याच्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही. शरद पवार यांनी देखील त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेले आहे. घरी बसलेल्यांना जनता घरी बसवून टाकते आणि लोकांमधील कार्यकर्त्यांना लोकांमध्ये येण्याची संधी देते’, असं टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सोडले आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन आमच्या 200 हून अधिक आमदारांपैकी एकावरही अन्याय होऊ देणार नाही. माझ्या नेतृत्वात कुणालाही सापत्न वागणून मिळणार नाही. सर्वांना समान न्याय देण्याचे काम माझे सरकार करेल, असेही शिंदे यावळी म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे निष्कलंक असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. “मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांचे मन मोठे आहे. आता मला मुख्यमंत्री केले तर स्वतः उपमुख्यमंत्री झाले. आम्ही सोबती आहोत. त्यांचा अनुभव राज्याच्या विकासासाठी वापरत आहोत. त्यातच स्वतः उपमुख्यमंत्री असतानाही फडणवीस यांनी अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारले. हा त्यांचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस आजच्या राजकारणातील, युतीतील कलंक नाही तर खरा निष्कलंक माणूस आहे.”ण तेवढा मोठेपणा, दिलदारपणा असावा लागतो. पण कोतीवृत्ती, कद्रूपणा असलेल्या व्यक्तीकडून ते शक्य नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.