अजित पवार गटासोबत सत्तेत सहभागी झालेले दिलीप वळसे-पाटील यांनी प्रथमच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांवर थेट हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असे आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना एकदाही बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही, अशी घणाघाती टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. देशातील अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पाहिले तर ते पुढे जात आहेत. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. आपल्याकडं शरद पवारांसारखे नेते आहेत. मात्र शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपले फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
आपण अजूनही भाजप सोबत गेलेलो नाही तर आपला पक्ष हा राष्ट्रवादी काँगेस हाच आहे. आपण अजूनही राष्ट्रवादी काँगेस पक्षामध्येच आहोत. चिन्ह कोणाला मिळेल, नाव कोणाला मिळेल याबाबत निवडणूक आयोग निर्णय देईल. मात्र त्यांचा निर्णय आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक पंचायत होऊ शकते, असं सूचक विधानही वळसेपाटील यांनी केलं.ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले असा अपप्रचार केला जात आहे. ते चुकीचे आहे. तशी नोटीस कोणाला सापडली तर घेऊन या. आमदारकीचा लगेच राजीनामा देईल.असंही वळसे पाटील म्हणाले.
