45 हजारांच्या 65 खुर्च्या, उदय सामंत यांनी मांडला इंडिया आघाडीच्या बैठकीचा खर्च

मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये इंडिया आघाडीची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक होत आहे. या बैठकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी या बैठकीवरुन आघाडीवर टीका केलीये. आम्ही गुवाहाटीला गेलो, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलो म्हणून टीका करण्यात आली. पण, आता मुंबईतील बैठकीसाठी कोट्यवधींचा खर्च होत आहे, त्याचं काय? असा सवाल सावंत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 31 आणि 1 तारखेला असंतृष्ट लोकांचा मेळावा भरतोय त्याला इंडिया असं नाव देण्यात आलंय. स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी देशाच्या नावाचा उपयोग केला जातोय.२ दिवसांची ही बैठक नाही. यात विविध कार्यक्रम आहेत. आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा पंचतारांकित हॅाटेलमध्ये राहिलो, यावरुन टीका केली. आता यांची व्यवस्था बघा.असं ते म्हणाले.

यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, ही त्यांची बैठक 14 ते 15 तासांची आहे. आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो तेव्हा हे पंचतारांकित हॉटेलबद्दल बोलत होते.”45 हजारांच्या 65 खुर्च्या या बैठकीसाठी मागवण्यात आल्या आहेत. चौदा ते पंधरा तासांच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आमच्या हॉटेलचा खर्च काढण्यात येत होता. ग्रॅण्ड हयातमधील एका खोलीचा दर हा 25 ते 30 हजार रुपये इतका आहे. ग्रँड हयातमधील एका खोलीचा दर हा 25 ते 30 हजार रुपये इतका आहे.”

दरम्यान, इंडिया आघाडीतील अनेक पक्ष असे आहेत ज्यांनी बाळासाहेबांवर टीका केली होती. कलम 370 रद्द करावे यासाठी बाळासाहेबांनी मागणी केली. त्यावर बहुतांश नेत्यांनी टीका केली. राम मंदिर, कारसेवा याबाबतही बाळासाहेबांवर टीका केलीय. आज महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की, जी यादी हॉटेलला दिली आहे. त्यात उद्धव ठाकरे 26 नंबरवर वर शरद पवार 25 नंबरवर आहेत. महाराष्ट्रातले 2 पक्ष शेवटून 2-3 नंबरला आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊ न देण्यासाठी असंतुष्टांची ही बैठक आहे असंही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.